चालू घडामोडी (दिनांक 22 नोव्हेंबर 2021) || Current Affairs in Marathi on OSM Naukri

 चालू घडामोडी

दिनांक - 22 नोव्हेंबर 2021 

    1) रक्षा अलंकरण समारंभात देश रक्षणात साहस दाखविणाऱ्या जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामध्ये दोन किर्तीचक्र, एक विरचक्र, दहा शौर्यचक्र, चौदा परमविशिष्ठ सेवा पदक,दोन उत्तम युद्ध सेवा पदक आणि सव्वीस अति विशिष्ठ सेवा पदक प्रदान करण्यात आले. 
      2) फेब्रु 2019 मध्ये F 16 हे पाकिस्तान हवाई दलाचे विमान विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांना विरचक्र देवून गौरवण्यात आले तसेच प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले.
        3) स्वदेशी बनावटीची सर्वात मोठी विनाशिका विषाखापट्टणम ही युद्धनौका काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नौदलात  दाखल झाली. या या युद्धनौकेचे वजन 7,400 टन आहे आणी ही विनाशिका 163 मी लांब तर 17 मी रुंद आहे. ही युद्धनौका तासी 54 किमी वेगाने प्रवास करू शकते.
          4) भारतात लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 1 अब्ज 17 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 76 कोटी 77 लाखाहून अधिक पाहिला डोस तर 40 कोटी 24 लाखांहून अधिक लोकांना दोन्ही डोस देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 10 कोटी 70 लाखांहून अधिक लोकांना डोस देण्यात आले आहेत.
            5) गोवा येथे भरण्यात आलेल्या 52 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट (इफ्फी) मोहोत्सवाच्या दरम्यान अनुराग ठाकूर (माहिती व प्रसारण मंत्री) यांच्या हस्ते  भारतीय पॅनोरमाच उद्घाटन करण्यात आले.


            ◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

            मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri