निळावंती - एक रहस्य !
निळावंती हा एक असा विषय आहे की त्याविषयी समाजात बऱ्याच अफवा पसरवल्या जातात किंवा गेल्या आहेत. निळावंती हा ग्रंथ वाचल्याने आकस्मित मृत्यू येतो किंवा हा ग्रंथ वाचणारा येडा होतो अशा अफवा समाजात पसरल्या आहेत. तर आज आपण या पोस्ट मधून निळावंती ग्रंथाविषयी माहिती पाहणार आहोत. निळावंती हा रहस्यमय ग्रंथ लेखक भास्कर भट्ट याने 17 व्या शतकात लिहिला. परंतु तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारने या ग्रंथावर 1935 साली बंदी आणली. त्यावेळी या ग्रंथाच्या सहाय्याने काळी जादू किंवा अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केला जात असल्याने यावर बंदी घालण्यात आली. आता आपण असे काय आहे या ग्रंथात याची अधिक माहिती पाहू.
निळावंती हा ग्रंथ वाचल्याने पशू-पक्षांची भाषा अवगत होते असे बोलले जाते. व त्यांच्याकडून गुप्त धनाचा शोध लागतो. असा समज आहे. आता आपण निळावंती ही कोण आहे हे पाहू, निळावंती ही एका श्रीमंत माणसाची मुलगी असते आणि तिच्या जन्माच्या वेळी तिच्या वडिलांना गुप्त धन सापडते आणि ते एका दिवसात श्रीमंत बनतात. निळावंती ही त्यांची एकुलती एक मुलगी असते. त्यामुळे ती लहानपणापासूनच एकटी राहत असे. त्यामुळे ती सभोवतालच्या पशू-पक्षांची मैत्री करते. हळू हळू त्यांची मैत्री वाढत जाते. निळावंतीला पशू-पक्षांची भाषा अवगत होती.
एके दिवशी निळावंती एकटीच एका झाडाखाली बसली होती, अचानक तिला कोठूनतरी कसलातरी आवाज एकू येतो. तेव्हा ती आपल्या सभोवताली पाहते तर कोणच नसते आणि ती खूप घाबरते. थोड्यावेळाने तिच्या लक्षात येते की दोन मुंग्या आपापसात भांडण करत होत्या. त्या मुंग्या पावसाळ्यात आपल्या घराला पावसापासून कसे वाचवायचे या विषयी संभाषण करत होत्या. तिला क्षणभर स्वतःवर विश्वासच बसेना. नंतर तिच्या लक्षात येते की तिला मुंग्याची भाषा समजत आहे.
थोड्याच वेळाने तिच्या लक्षात येते की सर्वच पशू-पक्षांची भाषा तिला एकू आणि समजू लागली आहे. एके दिवशी मुंगूस तिला गुप्त धनाचा रस्ता दाखवू लागले. असे म्हणतात की मुंगूसाला गुप्त धनाची माहिती असते कारण ते कुबेराचे वाहन आहे. असे म्हटले जाते कि मुंगूसाचे बिळ शेवटपर्यंत उकरले तर गुप्त धन मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर निळावंती चे लग्न होते. लग्नानंतर निळावंती सासरी जात असताना तिला वाटेतच एक मुंगूसाची जोडी दिसते. त्या जोडीमधील मादी मुंगूसाचा आवाज येतो. ती मादी मुंगूस तिला सांगत असते की माझा जोडीदार आंधळा आहे माझी मदत कर. निळावंतीला त्या मुगूसाची दया येते. मुंगूसाच्या आजारावरील औषध तिला माहीत होते. तिने ते औषध दिलयानंतर तो नर मुंगूसाची दृष्टी परत येते. याची परतफेड म्हणून ते मुंगूस तिला गुप्त धनाविषयी माहिती सांगतात.
त्यानंतर पुढे प्रवासात एक म्हातारा भेटतो. आणि तिला नाग आणि नागमणी याविषयी गोष्ट सांगतो. ज्यांच्याकडे नागमणी आहे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे तिला नागमणी शोधण्याचे वेड लागते. एके दिवशी ती मुंगूसाच्या जोडीला घेते आणि जंगलात नगमणीच्या शोधात जाते. तिला नागमणी शोधता शोधता रात्र होते. एकाऐकित तिला उजेड दिसतो तर ती पाहत असते की एक नाग आपल्या नगमण्याच्या उजेडात भक्ष्य शोधत आहे. लगेच ती त्या मुंगूसाच्या जोडीला त्या नागाला मारण्याची आज्ञा देते आणि नगमणी घेऊन ती तेथून निघते. त्या नागमण्यामुळे तिची प्रचंड शक्ति वाढते.
परंतु तिची गुप्त धनाबद्दलची ओढ अधिकच वाढते. एके दिवशी मध्यरात्री कोल्हयाची ओरडणे तिच्या कानावर येते. ते कोल्हे आपापसात सांगत असतात की नदीतून एक प्रेत वाहत आले आहे आणि त्याच्या कमरेला बांधलेल्या लाल कापडात मोती आहेत. हे एकूण निळावंती गुपचूप त्या दिशेने निघते परंतु तीची चाहूल तिच्या नवऱ्याला लागते. आणि तिच्या पाठीमागे जातो. निळावंती त्या प्रेतापाशी जाते आणि त्या प्रेताला पकडते आणि त्या प्रेताच्या कंबरेला बांधलेले लाल फडके दाताच्या सहाय्याने काढू लागते. तेव्हा तीचा नवरा हे सगळे पाहत असतो. नंतर तिचा नवरा निळावंतीला सोडून देतो .
नवऱ्याने सोडून दिल्यानंतर निळावंती आपल्या माहेरी येते. तेव्हा ती आपला सगळं वेळ पशू - पक्षांच्या सानिध्यात घालविते. निळावंती आता सर्वच पक्षांची प्राण्यांची भाषा अवगत करते. एके दिवशी तिला स्वप्न पडते की तिला अवगत असलेली विद्याचा उपयोग गोर-गरिबांसाठी व्हावा. तेव्हा ती सर्व विद्या एका ताम्रपत्रावर लिहून काढते. जेव्हा हा ग्रंथ लिहून पूर्ण होतो तेव्हा तिचा मृत्यू होतो.
निळवंतीच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ तिच्या वडिलांना सापडतो आणि ते हा ग्रंथ वाचतात आणि ते वेडे होतात. जेव्हा हा ग्रंथ एका साधू च्या हातात पडतो तेव्हा ते हा ग्रंथ आत्मसात करतात आणि आपल्या शिष्यला शिकवतात.
अशाप्रकारे ही निळावंतीची कहाणी आहे.